भुमीपुजन

आज अक्षय तॄतीयेच्या शुभमुहुर्तावर सहकुटुंब सहपरीवार ‘वनराई’ला गेलो होतो. मी या जमिनीचे नाव ‘वनराई’ ठेवले आहे. आज जमिनीची पुजा केली.
म्हटले,’बयॊ, तुझ्याशी मैत्री करायचा संकल्प करतोय, तथास्तु म्हण. आजवर काही दुखले खुपले असेल तर माफ कर आणि ‘संभवा’ हो. नवनवॊन्मॆषशालिनी हो.’ बघुया ऎकते का.

राग दरबारी

काल पौडच्या कचेरीत जाउन जागेचे खरेदी खत केले. कायदेशीर मराठी मजेशीर आहे. खरेदीखत करताना फ़क्त जमीन नव्हे तर तिच्यावरील दगड, तॄण, वॄक्ष, तळंगभुत गॊष्टी, वहीवाटीचे रस्ते सर्वांची मालकी लिहुन घेणे आवश्यक आहे. जमीन वडीलोपार्जित असेल तर खरेदीखतावर मालकाच्या मावळणी, कर्ते व इतर मुलगे सगळ्यांची सही लागते.
सरकारी कचेरीत जाउन खरेदीखत रजिस्टर करण्यात आमचा कालचा सगळा दिवस [...]

शोध

अभयने त्याच्या चिकित्सक वृत्तीनुसार शोधमोहीम हाती घेतली आहे. जागा फार लहान नकॊ फार मोठी नकॊ. आपल्या बजेटमध्ये बसणारी हवी. शहरापासुन फार लांब नकॊ. माती सुपीक हवी. पाणी उपलब्ध हवे…. हजार अटी.
त्यानॆ मुळशी धरणाजवळचा, खेळते नदीचे पाणी असणारा हिरवा टापू निवडला. आणि शोधकार्य आरंभ केले. गेले दोन महीने  दर शनीवार रविवार त्याचा जमिनी बघण्याच्या मोहिमा सतत [...]

सॄजन

आपण काहीतरी निर्माण करत आहोत ही भावना खुप आनंद देणारी असते. नवा लेख लिहीताना, नवी कविता रचताना याचा प्रत्यय येतो. पण या सर्वांपेक्षा आगळा आनंद आहे मातीची सॄजनशक्ती जागॄत करायचा. भुमीवर कष्ट करुन हिरवाई फुलवायचा.
मनात खॊलवर दडलेला मॄद्‌गंध अनुभवत यावा म्हणुन केलेला खटाटॊप.
गर्द हिरवाई वाढवावी, तिची सावली अनुभवावी, भुमीची सॄजनशक्ती पालवावी म्हणुन ही उठाठेव,
आणि हा [...]