नवभुमी दावीन मी ..

नवभुमी दावीन मी, या नगराला लागुनीया सुंदर ती दुसरी दुनीया
उन्हाळ्याच्या सुट्टीत रहायला आलेल्या पाहुण्याना ‘वनराई’ ला पिकनिकला नेणे हा एक नेहमीचा यशस्वी प्रोग्रॅम झालाय. राई सगळ्यांना खुप आवडते. छान वाटते, कौतुक ऎकुन.

माया

दिवे आगरची माडांची वाडी, हिरवाई अगदी खोलीत डोकवत होती.
समस्त परिवार दिवे आगरला गेलो होतो. तिथे उदय बापट यांच्याशी ओळख झाली. महाराष्ट्र शासनाने त्यांना उद्यानपंडीत हा सन्मान देउन गौरवले आहे. ते दिवे आगरच्या परिसरात शास्त्रीय पद्धतीने बागायत करतात. अशी संधी प्राप्त झाल्यावर आम्ही तिचा पुर्ण फायदा करुन घेतला. बापटांना प्रश्न विचारुन भंडावुन सोडले. त्यांनी मोठ्या अगत्याने [...]

मनातले मांडे

आधी या उन्हाळ्यात झाडांचे खड्डे घ्यायचा विचार होता. पण मग वाटले घाई करु नये. आधी माहिती मिळवावी.
अभयला आंब्याची झाडे लावायची आहेत. मला फुलांची. चाफ्याची, गुलमोहोराची, कांचनाची, शिरीष, आमलताश, औषधी आणि मसाल्याची. बघु काय काय जमते ते.