आपला तो बाब्या!

‘ये तेरा घर ये मेरा घर
किसीको देखना हो गर,
तो पहले आके मांग ले,
तेरी नजर, मेरी नजर’
तसं बघायला गेलं तर, शेकडो जमिनीचे तुकडे आहेत त्या भागात. शेकडो धबधबे कोसळतायत. पण आमची राई कशी लाखात एक आहे, आमचा कसा ‘झरा वाहतो नक्षत्रांचा’ हे पाहायला आमची ‘नजर’ हवी. गौराईची फुलं फुलली आहेत डोंगरावर. आजीबाईंनी सांगितलं की ही फुलं गौरीच्या [...]

राग दरबारी – २

आज तलाठी मुळशी यांनी आपली कारवाई पुर्ण केली आणि सरकार-दरबारी, सात-बारा, इ. सर्व ठिकाणी वनराई चे मालक म्हणुन आमचे नाव लागले. पहिला गड सर झाला. सर्व कागदपत्र आमच्या हाती आले. आज १७ ऑगस्टला एका लेकीच्या वाढदिवशी दुस-या लेकीचे ‘बर्थ सर्टीफिकेट’ आलं हा एक छोटासा योगायोग.

रुद्र्सुंदर

वनराई आणि आसपासच्या परिसराचे वर्णन ह्या एका विशेषणाने करता येईल रुद्रसुंदर. पाउस नुसता कोसळतो आहे. चार तासात १६४ मिली पाउस नोंद म्हणजे काय झाले? सगळी सृष्टी जलथल झाली आहे, जमीन, झाडे, हवा सगळे जलमय.

गेल्या शनीवारी आम्ही तिघं गेलो होतो राईवर भिजायला. तिथुन पुढे एक रस्ता वळत वळत जातो वळणे गावाला. तिथे डोंगराच्या अंगाखांद्यावरुन धबधबे [...]