इथेच टाका तंबू!

अभयने अमेरिकेहुन येताना एक आटोपशीर तंबू आणला. त्याचे उद्घाटन राईवर करायचा विचार चालु होता. पण जरा जवळपास जाग असावी म्हणुन वाडीवरच्या शंकरदादांच्या शेतात तंबू ठोकायचं ठरलं. शंकरदादांच्या घरी रात्रीचे जेवण, तंबू आणि शेकोटी असा बेत केला. शंकरदादा आणि त्यांच्या कुटुंबाने इतक्या आपुलकीनॆ आदरातिथ्य केले की बस! जेवणाला तांदळाच्या भाकरी, कोंबडीचं मटण (!) आणि पावट्याची उसळ, [...]