Posted by: manura | May 20, 2007

उन्हाळी कामे…२

raee_may1.jpg
सध्या कामांना जोर आलाय. 

राईच्या दोन्ही बाजुंना असणा-या जमिनींवर बांधकामांची हालचाल दिसु लागली आहे. दोन्ही शेजा-यांनी JCB लावुन डोंगर फोडुन रस्ते काढले आहेत. तांबडी लाल माती खोदली जाते आहे.

पावसाळा उंबरठ्यावर येउन ठेपला आहे. मावळतीच्या अंगाने ढगाची चढाई आत्ता सुरु होईल. त्यामुळे सगळीकडेच कामांची घाई सुरु झाली आहे. शेतात औत सुरु झाले आहेत.

जमिनीच्या कडेकडेने खड्डे घ्यायला सुरुवात केली आहे. अजुनही जमिनींच्या सीमांचा नीट अंदाज येत नव्हता. खड्डे शीवेवर नीट यावेत म्हणुन दोरी लावुन घ्यायला हवी होती. मग पेठेत जाउन सव्वशे मीटर दोरी घेउन आलो.

राई पार सुकुन गेली आहे. तोडणी, भाजणी झाल्यावर मोकळं वाटतंय. पार खालपर्यंत दिसुन येत आहे.

raee_may3.jpg

मोजणी करताना, जमिनीच्या कोप-यांवर  खुंट्या ठोकुन ठेवल्या होत्या. खुंट्यांमध्ये दोरी लावली, आणि बॉर्डरपासुन एक फुटावर खड्डा सुरु केला. प्रत्येक खड्डा १.५ x १.५ x १.५ चा. दहा दहा फुटावर खड्डे खोदायचे काम सुरु आहे.


Leave a response

Your response:

Categories