Posted by: manura | May 30, 2007

लगीनघाई

पाउस राजा येणार अशी वाजंत्री जशी वाजु लागली तशी कामांची एकच झुम्मड उडाली आहे.

अभय जाउन येथल्या कृषीअधिका-यांना भेटुन आला. त्यांनी खुप आपुलकीने आणि उपायुक्त माहिती दिली. कोणती झाडे घ्यावीत, कशी लावावीत इ.

आमच्या राईवर होणा-या वा-या वाढल्या.  आजच जाउन, जागेवर कुठे खड्डे घ्यायचे त्याचे मार्कींग करुन आलो. कृषीअधिकारी आपणहुन आले त्यांनी योग्य मार्कींग करायला मदत केली.

ह्या वर्षीच लागवड सुरु करायचा बेत करत आहोत. तसे अजुन कुंपण झाले नाही. जनावरे शिरण्याचा धोका आहे, पण एक वर्ष वाया जाईल म्हणुन जोखीम घेत आहोत. बघुया. हे ही एक शिक्षण अनुभव नावाच्या गुरुकडुन. आंबा, पेरु, रातांबा, जांभुळ, आवळा, आणि कुंपणाला मोठी झाडे, कडुनींब, शेवगा, पिंपळ, बुच, बहावा, आमलताश लावावा असा विचार आहे.

बरोबरीने अभ्यास ही चालु आहे. कोणत्या जाती घ्याव्यात? कशी पेरणी करावी? पाणी किती लागेल? ऍग्रोवनची वेबसाईट खुपच उपयुक्त वाटली. आता काही पुस्तके मिळवायला हवी.

येत्या ८ – १० दिवसात झाडे येतील. पावसाबरोबरची शर्यत जिंकायला हवी.

आसपासच्या शेतात काम जोरात चालु आहे, उस बांधायचाय, औत चालवायचेत, पण औतगडी मिळत नाहीयेत, भात पेरायचाय. शेवटचे राहिलेले आंबे उतरवायचेत, एक ना दोन हजार कामे, नुस्ती लगीनघाई आणि बारात तो अभी आ जायेगी!


Leave a response

Your response:

Categories