कृषी आधिकारी, अभय आणि जमिनीच्या व्यवहारापासुन अनेक कामात बरोबर असणारे मनोहर असे तिघे महिंद्र पिक अप ट्रक करुन दापोलीला रोपे आणायला गेले.
मंडळी सकाळी सहाला निघाली. ताम्हिणी घाट ओलांडुन, माणगाव, महाड करत १२ वाजेपर्यंत दापोलीला पोहोचली. तर विद्यापीठ रोपवाटीकेची जेवणाची सुट्टी झालेली. आता २ वाजेपर्यंत थांबणे आले.
मग दापोलीच्या डॉ कोपरकरांच्या नर्सरीत गेले. तिथुन फुलवृक्ष, जास्वंदीचे नाना रंगा, आकारा, छटांचे दहा एक प्रकार (अभयला जास्वंदी फार आवडतात!) दोन त-हेचे सोनचाफे, पिवळा आणि केशरी, रंगी बेरंगी बोगनवेली अशी खरेदी केली.
विद्यापीठ नर्सरी उघडायला पावणेतीन वाजले. पण तिथली झाडे मात्र नामी होती, जवळच ज्या मातृवृक्षापासुन ही रोपे तयार केली, ते आंबा, रातांबे नुसते फळाने लहडले होते. सगळ्या फळझाडांची खरेदी झाली, चिंच आणि सीताफळ तेव्हढे मिळाले नाही. ती देशावरची झाडे, राहुरीला घेतली पाहिजेत. मजल दर मजल करत ही वृक्षदिंडी रात्री १० च्या सुमारास राईवर पोहोचली. बाळुच्या घरी सगळी रोपे उतरवली. ह्या घाईत अभयचा मोबाईल कुठेतरी पडला. पण नंतर परत वळणावर जाउन शोधला तर सापडला. आपटल्याने, डेटालॉस मात्र झाला. अभयला घरी यायला सव्वा अकरा वाजले. पुरता दमला होता बिचारा. परत उद्या राईवर जायला हवेच होते…
दापोली रोप ट्रिक – इतर तपशील:
पिक अप ट्रक – ३५००
मनोहर – ५००
कोप्स नर्सरी गर्हे, दापोली (डॉ कोपरकर) - फोन – ०२३५८-२८४५७८ मोबाईल – ९४२२४३१२५८
चिकु – ५ – ३० प्रमाणे
लिंबु – ६ – २०
मिरी – २ – ५
तुती – २ – १०
रक्तचंदन – २ – २५
पेल्टोफोरम – ४- २०
कडुनींब – २ – १५
तामण – ४ – १५
पेरु – ४ – २५
बहावा – ३ – १५
फणस – १ – ४५
पिंपळ – २ – २५
सोनचाफा – ४ – ५०
कामिनी – २ – १५
गुलमोहोर – ४ – २५
कदंब – २ – १५
बोगनवेल – १२ – ४०
जास्वंद १६ – २०
जास्वंद (खास!) १ – ५०
बदाम – २ – १०
डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली
जांभुळ – १० – १५
रातांबा – (कोकण अमृता) १० – १५
आवळा – (नरेंद्र – ७) ५ – २५
नारळ (टी डी) ३ – ४०
आंबा – केशर – ३५ – २५
रत्ना – १० – २८
हापुस – २५ – २८
तोतापुरी – ५ – २८
एकुण रोपांचा खर्च – २७३० रु.
Filed under: cultivation





maaJaI mahaD taalaukyaata k rmar gaavaata 5 ek r jaagaa Aaho. malaa taoqao AaMbaa va k ajau laavaavayaacaa Aaho. tarI AapaNa malaa saivastar maaihtaI dyaavaI