घुमड घुमड कर आई रे घटा!

झाडे तर सगळी नीट लावुन झाली. आठवडाभर रापा पडल्या. रापा म्हणजे मान्सून सुरू होण्या आधीचा सॅंपल पाऊस! झाडं आपल्या जागी रुळु लागली. हा पाउस थोडा सौम्य असल्याने झाडांना रुळायला थोडा वेळ मिळाला.

तसा आम्ही पुढचा उद्योग हाती घेतला.
झाडांना आधाराला बांबुचा सांगाडा बांधणे. जोराच्या वादळा पावसात झाडांना आधार द्यावा लागतो, नाहीतर एकतर ती उन्मळुन पडतात नाहीतर सारखी [...]