घुमड घुमड कर आई रे घटा!

झाडे तर सगळी नीट लावुन झाली. आठवडाभर रापा पडल्या. रापा म्हणजे मान्सून सुरू होण्या आधीचा सॅंपल पाऊस! झाडं आपल्या जागी रुळु लागली. हा पाउस थोडा सौम्य असल्याने झाडांना रुळायला थोडा वेळ मिळाला.
rope1.jpg
तसा आम्ही पुढचा उद्योग हाती घेतला.
झाडांना आधाराला बांबुचा सांगाडा बांधणे. जोराच्या वादळा पावसात झाडांना आधार द्यावा लागतो, नाहीतर एकतर ती उन्मळुन पडतात नाहीतर सारखी हलत राहिल्याने, मुळ नीट पक्की होत नाहीत.
वर वळण्याला जाउन बांबू सांगितले, ट्रॉलीत घालुन शंकरनाना घेउन आले, आणि त्याचे मांडव बांधले. 
bambu hause
हे होते न होते तोवर मात्र जोरात पाउस लागला.  आता उलट परिस्थिती झाली. आपण झाडाला घातलेलं पाणी आत रहावं म्हणुन अळं करतो तर इथे बाहेरुन जोरात वाहणारे पाणी मुळाशी साचु नये म्हणुन आळं करायचं आणि आतल्या पाण्याला रस्ता द्यायचा, मुळाशी थोडी भर टाकायची.
कुंपणाला जोर यावा म्हणुन बांबु लावले आणि तळाचा भाग काही ठिकाणी दगड लावुन भरुन घेतला.
kumpan.jpg
शंकर नाना आणि निवृत्तींनी हौसेने तुळस, गुलाब, मोगरे आणुन लावलेत.
जास्वंद, बोगनवेल, मिरीचे वेल लावुन झाले.
आता झाडे मस्त डोलत आहेत. चिकु सगळ्यात आधी तरारला. मग पेल्टो आणि गुल. आता लिंब. आंबे आजुन पालवले नाहीत पण मजेत आहेत.
घुमड घुमड कर आयी है घटा
बरसो रे नीर बरसो रे नीर
हरसु अब हरियाली छटा
बरसो रे नीर बरसो रे नीर! 

Leave a Reply