Category Archives: darabari
राग दरबारी – २
आज तलाठी मुळशी यांनी आपली कारवाई पुर्ण केली आणि सरकार-दरबारी, सात-बारा, इ. सर्व ठिकाणी वनराई चे मालक म्हणुन आमचे नाव लागले. पहिला गड सर झाला. सर्व कागदपत्र आमच्या हाती आले. आज १७ ऑगस्टला एका लेकीच्या वाढदिवशी दुस-या लेकीचे ‘बर्थ सर्टीफिकेट’ … Continue reading →
हत्ती गेला शेपुट राहिलंय
मोजणीच्या कामाला मग अजुन पिल्लं फुटली आणि सगळे काम व्हायला एक महिना लागला, अंदाज होता त्या पेक्षा थोडा जास्त परिसर आहे. सात बाराच्या उता-यावर शेतक-याच्या सह्या झाल्या पण तो अजुन आमच्या नावावर चढला नाही.
मोजणी झाली हो!
एक मोजणी सतराशे साठ विघ्न! आधी अभय परदेशी गेला, मग मोजणीरावांची तारीख मिळेना! आता मिळाली तारीख तर जो पाउस सुरु झाला म्हणता! गेला आठवडाभर नुस्ता धो धो कोसळतो आहे. वेड लागल्या सारखा. मुळशीला तर तसाही पाउस जास्त पडतो. म्हटले गेली मोजणी वाहुन. मोजणीरावांनी पण … Continue reading →
राग दरबारी
काल पौडच्या कचेरीत जाउन जागेचे खरेदी खत केले. कायदेशीर मराठी मजेशीर आहे. खरेदीखत करताना फ़क्त जमीन नव्हे तर तिच्यावरील दगड, तॄण, वॄक्ष, तळंगभुत गॊष्टी, वहीवाटीचे रस्ते सर्वांची मालकी लिहुन घेणे आवश्यक आहे. जमीन वडीलोपार्जित असेल तर खरेदीखतावर मालकाच्या मावळणी, कर्ते … Continue reading →




