Category Archives: Uncategorized
थेट पोस्टींग
राईवरुन पोस्टींग करते आहे. रिलायन्समुळे जमले. इथेच लॅपटॉप घेउन थेट. भन्नाट!
प्राणीसृष्टी
राईच्या पायवाटेवरुन परवा जात होतो, तर पायाखाली एक गवताची काडी तुरुतुरु पळत होती! तहकीकात केली तर तो एक किडा होता. Praying Mantis असावा.
Banana plantation
There is a well tended and lush green Banana plantation on the way to Raee. It was planted the very year when we started our Raee venture. We have seen the first Banana trees grow by almost another foot every … Continue reading
नव अंकुर
तुम्हाला आठवत असेल, जुनमध्ये मी नमुद केले होते की दिवे आगरहुन आणलेल्या रातांब्याच्या बिया मी आई-बाबांच्या बागेत पेरल्या. उदय बापटांनी सांगितल्याप्रमाणे गेले चार महिने आम्ही धीर धरुन कोंब यायची वाट पाहिली. माकडाची बाग अजिबात होऊ दिली नाही. आमच्या ‘सब्र का मीठा फल’ … Continue reading
आपला तो बाब्या!
‘ये तेरा घर ये मेरा घर किसीको देखना हो गर, तो पहले आके मांग ले, तेरी नजर, मेरी नजर’ तसं बघायला गेलं तर, शेकडो जमिनीचे तुकडे आहेत त्या भागात. शेकडो धबधबे कोसळतायत. पण आमची राई कशी लाखात एक आहे, आमचा … Continue reading
माया
दिवे आगरची माडांची वाडी, हिरवाई अगदी खोलीत डोकवत होती. समस्त परिवार दिवे आगरला गेलो होतो. तिथे उदय बापट यांच्याशी ओळख झाली. महाराष्ट्र शासनाने त्यांना उद्यानपंडीत हा सन्मान देउन गौरवले आहे. ते दिवे आगरच्या परिसरात शास्त्रीय पद्धतीने बागायत करतात. अशी संधी … Continue reading
मनातले मांडे
आधी या उन्हाळ्यात झाडांचे खड्डे घ्यायचा विचार होता. पण मग वाटले घाई करु नये. आधी माहिती मिळवावी. अभयला आंब्याची झाडे लावायची आहेत. मला फुलांची. चाफ्याची, गुलमोहोराची, कांचनाची, शिरीष, आमलताश, औषधी आणि मसाल्याची. बघु काय काय जमते ते.
शोध
अभयने त्याच्या चिकित्सक वृत्तीनुसार शोधमोहीम हाती घेतली आहे. जागा फार लहान नकॊ फार मोठी नकॊ. आपल्या बजेटमध्ये बसणारी हवी. शहरापासुन फार लांब नकॊ. माती सुपीक हवी. पाणी उपलब्ध हवे…. हजार अटी. त्यानॆ मुळशी धरणाजवळचा, खेळते नदीचे पाणी असणारा हिरवा टापू … Continue reading




